२०२३ मध्ये टाटा सफारी आणि महिंद्रा XUV700 कोणती कार चांगली ?

२०२३ मध्ये टाटा सफारी व महिंद्रा XUV700 दोन्हीही बऱ्यापैकी सामान फुचर्स मध्ये येतात, तर या दोन्ही पैकी कोणाची चांगली हा प्रश्न ग्राहकांना पडलेला कठीण प्रश्न, हा ब्लॉग तुमच्या समोर या दोन कार्स मध्ये काय फरक आहे हे सांगण्याचा प्रयत्न केलाय.

Introduction

२०२३ च्या आगोदर महिंद्राच्या SUVs ची कार बाजारात बऱ्यापैकी पकड होती. महिंद्राने आपली XUV मध्ये भरपूर सुविधा देऊन ग्राहकांना कित्तेक महिन्यांचे waiting असतांना देखील आपल्या सोबत जोडून ठेवले. त्याचे कारण म्हणजे दुसऱ्या कोणत्याही कंपनीने आपल्या ७ सीटर सुव मध्ये इतक्या सुविधा न्हवत्या दिल्या. परंतु २०२३ मध्ये टाटाला हे कळून चुकले आणि त्याने सफारी मध्ये खूपसारे बदल करून महिन्द्राला टक्कर द्यायचे ठरवलंय, सध्या परिस्थितीत असे दिसतंय कि, फुचर्स मध्ये टाटा सफारी ने महिंद्रा XUV700 ला पाठीमागे टाकले आहे. परंतु ग्राहकाने ठरवावे त्याच्यासाठी बेस्ट SUV कोणती आहे.
चला तर पाहू टाटा सफारी आणि क्सयूव्ही मधील काही टक्कर देणाऱ्या सुविधा.

सुरक्षा :

सरकार बऱ्याच वेळा कार निर्माता कंपन्यांना प्रवाशांच्या सुरक्षेवर भर देण्यास प्रेरित करते जेणेकरून देशातील वाहनांमुळे होणाऱ्या जीवित हानी मध्ये कपात होईल आणि प्रवांशाचा सुरक्षे मध्ये वाढ होईल.

आपली कार सुरक्षित आहे हे कसे सांगाल? ते कशे ठरवले जाते ते पाहूया.
कोणतीही कार बाजारात येण्याआगोदर त्या कारची प्रत्यक्ष धडक मारून चाचणी केली जाते. या चाचणी मध्ये बऱ्याच टेस्ट असतात, वयस्क तसेच लहान मुलांसाठी एखादी गाडी किती सुरक्षित आहे हे ठरवण्यासाठी वेगवेगळी चाचण्या असतात. हि चाचणी कारणासाठी एक दुसरीच निष्पक्ष अशी कंपनी असते उदाहरणार्थ ग्लोबल एनकॅप हि एक ब्रिटिश कंपनी असून अश्या चाचण्या करण्यासाठी नामांकित आहे.
ग्लोबल एनकॅप बद्दल जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा.

आता बघू कि ग्लोबल एनकॅप मध्ये प्रत्येक गाडीस किती गन मिळाले.
कोणत्याही गाडीस ५ स्टार रेटिंग मिळाले कि ती कर चांगली आहे असे मानले जाते.

महिंद्रा क्सयूव्ही७००


रेटिंग : महिंद्रा क्सयूव्ही७०० ला मिळालेत, वयस्कांनासाठी 5 स्टार तर लहान मुलांसाठी ४ स्टार.

खालील फोटो हा ग्लोबल एनकॅप वेबसाईट वरून घेतला आहे. आणिखीन माहिती मिळवण्या साठी इथे क्लॉक करा.

२०२३ टाटा सफारी

वयस्क आणि लहान मुलांसाठी टाटा सफारीला दोन्हीमध्ये मिळालेत ५ स्टार रेटिंग.

प्रौढांच्या सुरक्षिततेसाठी 5 star:

हे सूचित करते की वाहनाने क्रॅश चाचण्यांमध्ये आणि प्रौढ रहिवाशांशी संबंधित इतर सुरक्षा मूल्यांकनांमध्ये चांगली कामगिरी केली आहे. याचा अर्थ असा की कार विविध प्रकारच्या अपघातांमध्ये प्रौढ प्रवाशांना उच्च पातळीचे संरक्षण प्रदान करते.

बालकांच्या सुरक्षेसाठी 4 स्टार:

4-स्टार रेटिंग सूचित करते की हे वाहन लहान प्रवाशांसाठी चांगल्या पातळीचे संरक्षण देते. हे रेटिंग मुलांच्या सुरक्षिततेच्या आसनांची परिणामकारकता आणि वाहनातील प्रतिबंध आणि ते वेगवेगळ्या परिस्थितींमध्ये मुलांचे किती चांगले संरक्षण करतात याचा विचार करते.

हे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे की विशिष्ट चाचणी संस्था आणि ते मूल्यांकनासाठी वापरत असलेल्या निकषांवर अवलंबून सुरक्षा रेटिंग बदलू शकतात. सुरक्षितता रेटिंगचे स्त्रोत आणि सुरक्षिततेच्या कोणत्या पैलूंचे मूल्यांकन केले जात आहे हे समजून घेण्यासाठी आयोजित केलेल्या विशिष्ट चाचण्या नेहमी तपासा.

कोणत्याही परिस्थितीत, या सुरक्षितता रेटिंग असलेले वाहन हे सामान्यतः प्रौढ आणि लहान दोन्ही प्रवाशांसाठी सुरक्षित पर्याय मानले जाते आणि हे सूचित करते की निर्मात्याने त्यांच्या वाहन डिझाइन आणि अभियांत्रिकीमध्ये सुरक्षिततेला प्राधान्य देण्यासाठी प्रयत्न केले आहेत.

या कारच्या सुरक्षेबद्दल अधिक तपशील शोधण्यासाठी ग्लोबल NCAP साइटला भेट द्या.

ऑटो डिमिंग IRVM

सफारी मध्ये IRVM किंवा इनसाइड रीअर व्ह्यू मिरर (गाडीच्या पाठीमागून का येते हे पाहण्यासाठी वापरात येणारा आरसा) ऑटो डिमिंग फ्यूचरसह (डोळ्यावर येणारा प्रकाश कमी करतो) येतो जे तुमच्या TATA सफारीच्या मागे असलेल्या वाहनांमधून येणारा हाय बीम लाइट रोखते, ड्रायव्हरचे लक्ष विचलित करणे टाळते. जे रात्री राइड गुणवत्ता आणि सुधारित सुरक्षा सुधारते.

आरामदायी सुविधा: येथे टाटा सफारी फेसलिफ्ट XUV700 पेक्षा चांगली आहे

हात न वापरता डिक्की उघडता येते :

ही एक अशी सुविधा आहे ज्याच्याद्वारे तुम्ही फक्त हात वारे किंवा पाय वारे करून डिक्की दार उघडू शकता ही सुविधा तुम्हाला फक्त टाटा सफारी मध्ये मिळेल. सामानाची ने आण करताना ही सुविधा तुम्हाला खूपच उपयोगी पडेल. तर या उलट महिंद्रा मध्ये डिक्कीचे दार उघडण्यासाठी तुम्हाला हाताचा वापर करावाच लागेल.

वातानुकूलित सीट्स :

वातानुकूलित शेअर्स चेअर्स सीड्स सीड्स सीट्स टाटा सफारी मध्ये तुम्हाला चालकासाठी व चालकाच्या बाजूला बसणाऱ्या पॅसेंजर साठी वातानुकूलित सीट दिले आहेत जेणेकरून तुम्हाला प्रवासामध्ये एसी बरोबरच सीट देखील थंडगार मिळतील.

बटनांच्या साह्याने सीट मागेपुढे करा:

टाटा सफारी आणि महिंद्रा एक्सयूव्ही दोन्हीमध्ये तुम्हाला बटनाच्या साह्याने सीट अड्जस्ट करता येईल. सीट वर खाली करणे,सीट ची उंची कमी जास्त करणे, पाठीचा सपोर्ट मागेपुढे करणे ही सर्व कामे बटनाच्या सहाय्याने करता येतात.

ही सुविधा महेंद्र एक्सयूव्ही मध्ये फक्त ड्रायव्हर सीट साठी असून सफारी मध्ये ही सुविधा ड्रायव्हर आणि ड्रायव्हरच्या शेजारील सीट मध्ये सुद्धा आहे.

दुसऱ्या रांगेत कॅप्टन सीट :

सहा सीटच्या टाटा सफारी मध्ये ड्रायव्हरच्या मागची सीट देखील ड्रायव्हर सारखेच वातानुकूलित आणि ऍडजेस्टेबल मिळते.

सहा सीटरच्या सफारी मध्ये प्रत्येक ओळींमध्ये दोन सीट येतात, या सफारी मध्ये ड्रायव्हरच्या मागची सीट देखील ड्रायव्हर सारखीच कम्फर्टेबल व वातानुकूलित असते.

ड्रायव्हर ठेवणाऱ्या मालकांसाठी ही सुविधा वरदान आहे.

टाटा सफारी आणि महिंद्रा एक्स वि सातशे यांच्या आकारातील फरक:

लांबी: टाटा सफारी : 4668 मिलिमीटर तर महिंद्र xuv700 4696 मिलिमीटर.
रुंदी: टाटा सफारी 1922 मी. मी, xuv700 1890 मी. मी.
उंची: टाटा सफारी 1795 मी. मी, xuv700 1755 मी. मी.
दोन्ही चाकातील अंतर (व्हील बेस): टाटा सफारी 2741 मी. मी, xuv700 1750 मी. मी
चाक: टाटा सफारी 19 इंच, xuv700 18 इंच.
इंधन टाकी : टाटा सफारी 50 लिटर, xuv700 60 लिटर.

मनोरंजनाच्या सुविधा :

स्पीकर्स :

Mahindra XUV 700 Sony 12 स्पीकरच्या 3D साउंड सिस्टीमसह येतो. टाटा सफारी हार्मन ऑडिओवॉर्क्ससह 10 JBL स्पीकर प्रदान करते. अलेक्सा अँड्रॉइड/अ‍ॅपल कारप्ले या दोन्हींमध्ये साम्य आहे.स्पीकर्स

डिस्प्ले स्क्रीन :

Mahindra XUV 700 : ड्युअल 26cm HD टच स्क्रीन. इन्फोटेनमेंट आणि इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, या दोन स्क्रीन एका मोठ्या स्क्रीनमध्ये एम्बेड केलेल्या आहेत, प्रत्येक 26 सेमी डायमेंशनमध्ये आहे.

टाटा सफारी : टाटा सफारी मध्ये तुम्हाला दोन स्क्रीन पाहायला मिळतील.

इन्फोटेनमेंट: 31.24 हरमन टचस्क्रीन.

इन्स्ट्रुमेंट क्लस्टर: 26 सेमी स्क्रीन.

इंजिन

Tata Safari फक्त डिझेल इंजिनसह येते, तर Mahindra XUV डिझेल आणि पेट्रोल पर्यायांसह येते.

खाली तपशील आहेत.

निष्कर्ष:

TATA Safari फेसलिफ्ट लाँच होण्यापूर्वी महिंद्रा XUV700 खरेदीदारांची पसंती होती, खरेदीदार काय खरेदी करायचे याबद्दल अगदी स्पष्ट होते. पण टाटा सफारी फेसलिफ्ट 2023 लाँच झाल्यानंतर गेम बदलला आहे आणि आता खरेदीदारांना दोन SUV पैकी निवडणे अधिक कठीण झाले आहे. आणि तुमची गरज काय आहे आणि तुम्हाला काय चालवायचे आहे याचा तुम्ही विचार केला पाहिजे. त्यामुळे तुम्ही टेस्ट ड्राईव्ह शोरूमला भेट द्या आणि कारचा अनुभव घ्या. एकाच दिवशी टाटा आणि महिंद्रा शोरूमला भेट द्यावी असे मी वैयक्तिकरित्या सुचवितो. हे ठरवणे सोपे जाईल. मला आशा आहे की हा ब्लॉग तुम्हाला Mahindra XUV 700 आणि TATA Safari Facelift 2023 मधील मुख्य फरक हायलाइट करण्यात मदत करेल.

वाचल्याबद्दल धन्यवाद.

Global NCAP Safety test Videos:

Tata Safari Facelift 2023 safety test video :

Mahindra XUV700 safety test video

Thank you for reading. Like and share.

Leave a comment